‘आता केवळ अण्विक युद्ध होईल : पाकिस्तान कडून पुन्हा अणुहल्ल्याची धमकी

टीम महाराष्ट्र देशा : ‘आता केवळ अण्विक युद्ध होईल, परंपरागत पद्धतीनं युद्ध केलं जाणार नाही. ” पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी पत्रकार परिषदेत भारताचं नाव न घेता पुन्हा एकदा अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. आपल्या आक्षेपार्ह वक्तव्यांनी चर्चेत असलेल्या शेख या पोकळ धमकीमुळे पुन्हा आले आहे. भारताने रविवारी (ता. २०) पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना शेख म्हणाले ”आता ४-६ दिवस टँक, तोफा चालतील असं युद्ध केलं जाणार नाही, आता केवळ अण्विक युद्ध होईल. यापूर्वी मी १२६ दिवस आंदोलनात सहभागी होतो. त्यावेळी देशातील परिस्थिती वेगळी होती. आता एअर टँकनं हल्ला किंवा नौदलाकडून हल्ला केला जाणार नाही. आता केवळ अण्विक युद्ध होईल आणि ज्याप्रकारची गरज असेल त्या प्रकारे अण्विक हल्ला केला जाईल,” असंही ते म्हणाले.

यापूर्वीही जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिलेल्या धमकीनंतर शेख रशीद यांनी भारताला अण्विक हल्ल्याची धमकी दिली होती. ट्वीटर अकाउंट वरून व्हिडीओ शेअर करत ”इम्रान खान यांनी स्पष्ट संदेश दिला आहे. जर कोणी पाकिस्तानकडे डोळे वटारुन पाहिलं तर त्याचे डोळे बाहेर काढू. यानंतर ना चिमण्यांचा चिवचिवाट होईल, ना मंदिरातील घंटा वाजतील. आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत. आमच्यासाठी पाकिस्तानच जीवन आणि पाकिस्तानच मृत्यू आहे,” या शब्दात त्यांनी धमकी दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या :