आता रेल्वे प्रवाशांना ‘असं’ पाहता येईल रेल्वेत बनवलं जाणारं जेवण

indian railway

नवी दिल्ली : रेल्वेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबद्दल प्रवाशांच्या मनात सतत शंका असते. हे जेवण कसं तयार केलं जातं, ते तयार करताना स्वच्छता राखली जाते का, असे अनेक प्रश्न प्रवाशांन सतावत असतात. त्यामुळे अनेक प्रवासी रेल्वेत मिळणारे खाद्यपदार्थ खाण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे आता प्रवाशांसाठी आयआरसीटीसीनं महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. आयआरसीटीसीनं लाईव्ह स्ट्रिमिंग मॅकेनिजम विकसित केलं आहे. त्यामुळे रेल्वेमध्ये दिलं जाणारं जेवण नेमकं कसं तयार केलं जात हे पाहता येणार आहे.

रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईत झालेल्या एका बैठकीत याबद्दलची सूचना त्यांनी केली होती. यानंतर काल रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आश्विनी लोहानी यांनी काल आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरील लाईव्ह स्ट्रिमिंग सेवेचं उद्घाटन केलं. यामुळे आयआरसीटीसीकडून तयार केल् जाणाऱ् जेवण पाहता येईल. आपल्याला मिळणारं जेवण कसं तयार केलं जातं, ते तयार करताना आसपास स्वच्छता असते का, हे पाहणं .आता प्रवाशांना शक्य होणार आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरील गॅलरी सेक्शनमध्ये या व्हिडीओंची लिंक शेयर केली जाणार आहे. यामुळे खाद्यपदार्थ . कसे तयार केले, हे प्रवाशांना पाहता येईल.

काही दिवसांपूर्वीच आयआरसीटीसीनं नवीन वेबसाईट सुरू केली. या माध्यमातून प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणावरील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न रेल्वेनं केला आहे. प्रवाशांना अनेक गोष्टी सहज उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशानं ही नवी वेबसाईट तयार करण्यात आली आहे. लाईव्ह स्ट्रिमिंगची सुविधा सुरू करण्यापूर्वी अश्विनी लोहानी यांनी आयआरसीटीसीच्या नोएडातील एका किचनची पाहाणी केली होती. या किचनमधून राजधानीच्या 17 गाड्यांसह शताब्दी आणि दुरांतो गाड्यांना खाद्यपदार्थ पुरवले जाईल.