Uddhav thackeray- ग्राम पंचायती निवडणुकांवर लक्ष ठेवून निर्णय- उद्धव ठाकरे

वेबटीम : सरपंचाची निवड आता थेट गावकऱ्यांना करता येणार असल्याचा ऐतिहासिक निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. याआधी सरपंच पदाची निवड ग्रामपंचायत सदस्यांमार्फत केली जात होती. मात्र, या  पद्धतीत आता बदल करण्यात आला असून आता थेट गावकरी मंडळी सरपंच कोण होणार हे ठरवणार आहेत

सरपंचांची थेट मतदानानं निवड करण्याच्या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्र ग्राम पंचायत कायद्यात यासबंधी सुधारणा करण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत नुकताच यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी राज्यात आठ हजार ग्राम पंचायतींच्या होणाऱ्या निवडणुकांवर लक्ष ठेवून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं, ठाकरे म्हणाले.

You might also like
Comments
Loading...