आता गुजरातचा बटाटाही फसवा !

औरंगाबाद : बटाटा कापल्यानंतर पिवळा निघण्याऐवजी पांढरा निघतो त्यामुळे त्याला चव नसते म्हणून गुजरात मधून येणाऱ्या बटाट्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे घरगुती भाजी साठी हा बटाटा जाताच नाही म्हणून हा बटाटा खरेदी करणारा वर्ग हा हॉटेल व्यावसायिक आहे.

मध्य प्रदेश, पंजाबमधून नवीन बटाट्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे ग्राहक याच बटाट्याची मागणी करू लागले आहेत गुजरातमध्ये शीतगृहात बटाट्याचा साठा करून ठेवण्यात येत आहे. भाव कमी झाल्याने शीतगृहातील बटाटा बेभाव विकला जात आहे. औरंगाबादेत रविवारी ठोक विक्रीत अवघ्या २ ते ३ रुपये प्रतिकिलोने गुजराती बटाटा विकल्या गेला. तर इंदोरच्या बटाटा ६ रुपये किलोने विकल्या जात होता.

जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ग्राहकांशी बोलल्यानंतर ते म्हणाले की गुजरात मधून येणारा बटाटा सुद्धा मोदींप्रमाणे दिसायला चांगला दिसतो आणि आतून ही त्यांच्या सारखाच फसवा आहे