नोटबंदीनंतर आता नाणेबंदीची शक्यता?

टीम महाराष्ट्र देशा : नोटाबंदीनंतर सरकार नाणेबंदीच्या निर्णयाची घोषणा करण्याची शक्यता आहे. वास्तविक नोएडा, मुंबई, कोलकाता आणि हैदराबादमधील टाकसाळीत नाणी पाडण्याची कामं थांबवण्यात आली आहेत. ८ जानेवारी २०१८ पासून नाणे पडण्याचे काम थांबवण्यात आले आहे. त्यामुळे नोटबंदीनंतर मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि याचीच चर्चा सध्या सर्वसामान्यांमध्ये सुरु आहे.

आरबीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारपासून या चारही टाकसाळींना नाणी पाडण्याचं काम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नोटाबंदीनंतरचा हा आणखी एक दणका असल्याचे मानले जात आहे.

नाणेबंदीसंदर्भात दुसरही कारण दिल जात आहे, ते म्हणजे नोटाबंदीनंतर देशभरातील विविध टाकसाळीत मोठ्या प्रमाणात नाणी पाडण्यात आली होती. पण ही नाणी अजूनही मोठ्या प्रमाणात रिझर्व बँकेत स्टोअर करुन ठेवण्यात आली आहेत. चलनविषयक धोरण समितीकडे 2500 लाखापेक्षा जास्त नाणी स्टोअर आहेत. त्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत टाकसाळीत नाणी पाडण्याचं काम थांबवण्यात यावं असं सांगण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीची घोषणा केली होती. पंतप्रधानांच्या घोषणेमुळे 500 आणि 1000 रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. मोदी सरकारचा हा निर्णय भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरोधात घेतला असल्याच सांगितल होत.