भाजपच्या गोटातून किरीट सोमय्यांऐवजी आता नवा उमेदवार

kirit somaya

टीम महाराष्ट्र देशा – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेकडून सातत्याने विरोध होत होता. सोमय्या यांच्याविरोधात शिवसैनिकांनी ‘एकच स्पीरीट नो किरीट’ हा नारा दिला. त्यामुळे भाजपने या मतदारसंघातून नवीन उमेदवार घोषित करणार असल्याची चर्चा आहे.

Loading...

ईशान्य मुंबईतून भाजप- सेनेचा उमेदवार म्हणून भाजपच्या मनोज कोटक यांचं नाव पुढे येत आहे. शिवसेना भाजपच्या समन्वय समितीनं दिलेल्या अहवालानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या संसदीय समितीनं हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

जागावाटपात ईशान्य मुंबई मतदारसंघ भाजपकडे असला तरी या मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मर्जीशिवाय येथे उमेदवार देता येणार नाही. याची कल्पना भाजपला असल्यामुळे शिवसेनेच्या विरोधात किरीट सोमय्या यांना उमेदवारी देणे भाजपला शक्य नव्हते त्यातच शिवसेनेने जवळपास किरीट सोमय्या यांचा पत्ता कट केला आहे.

दरम्यान, शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी सोमय्या यांनी जोरदार प्रयत्न केले. पण मातोश्रीवरून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. सोमय्या यांनी भाजपमधील शिवसेनेच्या मित्रांकडून मातोश्रीवर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना कसलाही प्रतिसाद मिळाला नाही.Loading…


Loading…

Loading...