चित्रपटगृहांमध्ये आता राष्ट्रगीत अनिवार्य नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

सुप्रीम कोर्टाने ३० नोव्हेंबर २०१६ रोजी दिलेला आपलाच निर्णय बदलला

नवी दिल्ली : चित्रपटगृहांमध्ये सिनेमा सुरु होण्याआधी राष्ट्रगीत लावणं आता अनिवार्य नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाने ३० नोव्हेंबर २०१६ रोजी दिलेला आपलाच निर्णय बदलला आहे. सिनेमाआधी राष्ट्रगीत अनिवार्य करु नये अशी विनंती केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. या मुद्द्यावर आंतरमंत्रालयीन समिती स्थापन केली असून ती सहा महिन्यात आपल्या सूचना देईल, असं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं. यावर निर्णय देताना, थिएटरमध्ये चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत बंधनकारक नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल आहे.

काय आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय

१. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता की, देशातील सर्व थिएटरमध्ये सिनेमा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावणं अनिवार्य आहे.

bagdure

२. यावेळी स्क्रीनवर तिरंगा दिसायला हवा. तसंच राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ चित्रपटगृहांमध्ये उपस्थित सगळ्यांना उभं राहणं बंधनकारक आहे.

३. राष्ट्रगीत सुरु असताना सिनेमाहॉलचे गेट बंद केले जावेत, जेणेकरुन यावेळी अडथळे येणार नाही.

४. राष्ट्रगीत अशा कोणत्याही ठिकाणी छापू किंवा चिटकवू नये, ज्यामुळे त्याचा अपमान होई, असंही कोर्टाने स्पष्ट केलं होतं. राष्ट्रगीमधून व्यायसायिक लाभ घेऊ नये.

५. राष्ट्रगीत अर्ध-अपूर्ण लावलं आणि ऐकवलं जाऊ नये. ते पूर्णच लावलं पाहिजे, असंही सुप्रीम कोर्टाने आदेशाने म्हटलं आहे.

You might also like
Comments
Loading...