मराठा आरक्षणासाठी आता महायुतीचे नेतेही पंतप्रधानांना भेटणार

fadanvis vs modi

नागपूर : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. आता या भेटीनंतर आता राज्यातील महायुतीचे नेतेही पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. येत्या 20 तारखेनंतर मोदींची भेट घेणार असल्याचं रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

रामदास आठवले हे आज नागपूर दौर्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना आठवले यांनी हि माहिती दिली आहे. यावेळी ते बोलताना म्हणाले कि, ‘राज्यात मराठा आरक्षणाचा विषय आणि एसी, एसटीचा पदोन्नतीतील आरक्षण हे मोठे विषय आहेत. मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारला योग्य प्रकारे भूमिका मांडता आलेली नाही. मराठा समाज राज्यकर्ता आहे. श्रीमंत आहे. असं कोर्टाला वाटलं असावं. पण मराठा समाजात अनेक लोक गरीब आहेत. त्यांना आरक्षणाची गरज आहे. मात्र, त्यांना आरक्षण नाकारण्यात आलं आहे. 50 टक्के आरक्षण मर्यादेच्या पुढे जाऊन आरक्षण देता येऊ शकते. हे कोर्टाला पटवून देण्याची गरज आहे,’ असं ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी आठवले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर भाष्य करताना तुफान फटकेबाजी केली आहे. अजित पवार हे महाराष्ट्रभर त्यांच्या खास शैलीमध्ये बोलण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळेच ते बोलताना ‘कोण माय का लाल’ या वाक्याचा सातत्याने वापर करताना आपल्याला पाहायला मिळाले आहे.

हाच धागा पकडत रामदास आठवले यांनी अजित पवारांना यांना टोला लगावला आहे. यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, ‘अजित पवार म्हणतात की कोण लाल आहे जो हे सरकार पाडून दाखवेल, तर मी म्हणतो तो लाल अजित पवारच आहेत,’ असा खरमरीत टोलाह आठवले यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP