‘आता भक्त स्वत:ला चौकीदारनंतर जासूस म्हणायला पण कमी करणार नाहीत!’

मुंबई : ‘द वायर’ या वेबाईटसह आणि अन्य १६ माध्यम संस्थांनी केलेल्या संयुक्त आंतरराष्ट्रीय शोधपत्रकारितेतून समोर आले आहे. हॅकिंगद्वारे भारतातील मंत्री, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांचे फोन हॅक करण्यात आले असण्याची शक्यता या माध्यम संस्थांच्या ‘प्रोजेक्ट पेगॅसस’मध्ये व्यक्त करण्यात आली आहे. पेगासास हे सॉफ्टवेअर इस्राईल देशाची सायबर सुरक्षा कंपनी ऐनएसओ ने तयार केले आहे. देशाच्या सुरक्षेच्या या दृष्टीने याची निर्मिती करण्यात आली आहे.

या घटनेवर विरोधकांनी केंद्र सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न केला आणि अनेक आरोप केले. तर सरकारनेही स्पष्ट केले आहे की, सरकारने पाळत ठेवल्याच्या आरोपाचा कोणताही ठोस आधार किंवा कोणतेही सत्य नाही.

दरम्यान, या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी समर्थकांना टोला लगावला आहेत. ‘मै भी चौकीदार नंतर अंधभक्त मंडळी आता स्वतःला मै भी जासुस म्हणवून घ्यायला कमी करणार नाही..! अशा शब्दात पटोलेंनी कोपरखळी लगावली आहे. तसेच त्यांनी आपल्या पोस्ट ध्ये भाजपचा भारतीय जासूस पार्टी असा उल्लेख केला आहे.

भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मै भी चौकीदार असा प्रचार केला होता, आपण या देशाचे चौकीदार आहोत अस त्यावेळी भाजपला म्हणायचं होत. आता हेरगिरीचा मुद्दावरून विरोधकाकडून केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. या मुद्यावर भारत सरकार कडून स्पष्ट नकार दिला असून हे आरोप फेटाळून लावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP