भाजपच्या शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष पदासाठी आता वयाचे निकष

bjp flag

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना आता वयाचे निकष लावले जाण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने चर्चाही वरिष्ठ पातळीवर झाली आहे. बुधवारी असे मार्गदर्शकतत्व भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक निवडणूकीसाठी दिले आहे.

दोन्ही पदांसाठी आता 50 वर्ष वयाच्या अटीची शक्यता आहे. हा नियम लागू झाल्यास शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या अनेक दिग्गजांच्या आशेवर पाणी फिरणार आहे. भाजपने संघटनात्मक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक प्रक्रियाविषयी प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी मराठवाडा विभागाची एक कार्यशाळाही बुधवारी येथील भानूदास चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

24 नोव्हेंबरपर्यंत त्याची पडताळणी, 15 ते 25 नोव्हेंबर बुथ अध्यक्ष व बुथ समिती सदस्यांची निवड, 25 ते 30 नोव्हेंबर मंडळ अध्यक्ष आणि मंडळ समिती सदस्यांची निवड तसेच एक ते 10 डिसेंबरपर्यत शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व समिती सदस्याची निवड आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्षाची निवड केली जाणार आहे.

दरम्यान, शहराध्यक्ष पदासाठी अनेक दिग्गज इच्छुक आहेत. यात प्रामुख्याने प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल मकरिये, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, कामगार नेते संजय केणेकर, आमदार अतुल सावे यांच्यासह विद्यमान शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांची नावे चर्चेत आहेत.

पक्षाने शहर व जिल्हाध्यक्षपदासाठी 50 वर्षापर्यंतचा असावा, असे निवडणूक पद्धतीत नमूद केले आहे. यंदाच्या निवडणूकीत वयाची या मर्यादाचे काटेकार पालन केले जाणार किंवा नाही, याचा स्पष्ट असा उल्लेख करण्यात आला नाही परंतू त्याप्रमाणे यंदा पालन झाल्यास शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या पैकी काहीजणांचे वयामुळे पत्ते कट होऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या