fbpx

“आता सांगा शिवसेना कोणाची बिल्डरांची की कामगारांची”?

मुंबई – “आता सांगा शिवसेना कोणाची बिल्डरांची की कामगारांची”? असा सवाल काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी असा प्रश्न उपस्थित करत त्या आशयचे ट्विट केले आहे. बेस्ट कर्मचारी संपावरून राणे यांनी शिवसेनेला टार्गेट केलं आहे.

मुंबईत गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अद्याप मिटलेला नाही. त्या संपावरून नितेश राणे यांनी बिल्डरांकडून बेस्टला ३२० कोटी रुपयांचे येणं आहे. “आता सांगा शिवसेना कोणाची बिल्डरांची की कामगारांची?” असा प्रश्न उपस्थित केला आहे .

बेस्ट संपाबाबत मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मंगळवारी कुठलाच तोडगा निघाला नाही. बैठकीत कामगार संघटनांच्या मागण्या आणि त्यातील त्रुटींवर चर्चा झाली. मात्र कुठलाच तोडगा निघू शकला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बेस्ट प्रशासनामध्ये चर्चा झाली आहे. परंतू यातून सकारात्मक तोडगा निघाला नाही. त्यामुळे संप अजूनही चालूच आहे