आता पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार  

blank

टीम महाराष्ट्र देशा – येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभरात जोरदार प्रचार सुरु आहे. युती आणि आघाडीतील सर्वच उमेदवार एकमेकांवर शरसंधान साधत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही महाराष्ट्रातून जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. मोदींची पहिली सभा वर्धा येथे झाली. आता या आणि पुढच्या आठवड्यातही मोदींच्या बऱ्याचं सभा असणार आहे. मात्र विशेष म्हणजे यावेळी मोदी शिवसेनेच्या सभेमध्येही उपस्थित राहणार आहेत.

शिवसनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे उस्मानाबादच्या लोकसभेच्या रिंगणातून निवडणूक लढवणार आहेत. ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारसभेला खुद्द पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.

येत्या ८ एप्रिलला सकाळी ११ वाजता उस्मानाबादमध्ये शिवसेनेच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात येणार आहेओमराजेंसोबत आसपासच्या मतदारसंघातील उमेदवारही या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, यावेळी पंतप्रधान काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

दरम्यान, येत्या शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे आमनेसामने येणार आहेत. शनिवारी नांदेड येथे मोदींची प्रचार सभा आहे तर दुसरीकडे शिवाजी पार्क येथे मनसेचा मेळावा असणार आहे.