आता ‘गुगल पे’ , ‘पे टीएम’ ला टक्कर देणार ‘या’ कंपनीच पेमेंट अ‍ॅप

पेमेंट अ‍ॅप

नवी दिल्ली : अद्ययावत आर्थिक व्यवहारांमुळे ग्राहकांचे अनेक व्यवहार सुरळीत पणे पार पाडतात. तर अनेकदा ग्राहकांना हीच ऑनलाईन पेमेंट अ‍ॅप्स विविध आकर्षक योजना आकर्षित करत असतात. यामध्ये ‘गुगल पे’ , ‘पे टीएम’ , ‘फोन पे’ यांचा उल्लेख करता येईल यामध्ये आता या ॲप्स ना स्पर्धा निर्माण झाली आहे कारण आता यामध्ये आणखी एका कंपनीने भारतीय पेमेंट मार्केटमध्ये येण्याची तयारी सुरू केली आहे.

‘वन प्लस’ या चिनी मोबाईल निर्माता कंपनीने लवकरच भारतात पेमेंट अ‍ॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे. ‘वन प्लस च्या नव्या पेमेंट अ‍ॅपचं नाव ‘वन प्लस पे असेल. हे पेमेंट अ;ॅप सध्या बाजारात असलेल्या गुगल पे’ , ‘पे टीएम’ , ‘फोन पे’ आणि व्हाट्सअप पेमेंट सारख्या अ‍ॅप्सला चांगलीच टक्कर देईल असं बोललं जात आहे.

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, वन प्लस चं नवं पेमेंट अ‍ॅप या महिन्यात सुरू होऊ शकतं. मात्र कंपनीने या अ‍ॅपबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये प्रवेश करत असलेली ही कंपनी अगोदरपासूनच चिनमध्ये या ऑनलाईन पेमेंट अ‍ॅपची सेवा देत आहे.

महत्त्वाच्या बातम्या