पाकिस्तानचा सूड घेण्याच्या तयारीला लागा

सामनामधून उद्धव ठाकरेंचा सरकारला सल्ला

वेबटीम : 10 जुलैच्या रात्री जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात अमरनाथ यात्रेला निघालेल्या 7 भाविकाना आपले प्राण गमवावे लागले आहेत . तसेच तीन पोलिसांसह 32 जन जखमी झाले.  या हल्याच्या पार्श्वभूमीवर पाकड्यांचे ‘सोंग’ आणि ‘ढोंग’ ओळखून हिंदुस्थानने अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा सूड घेण्याच्या तयारीला लागायला हवे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती वाढल्या आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन, दहशतवादी हल्ले, शहीद जवानांच्या मृतदेहाची विटंबना करणे  यांसारख्या घटनांवर संताप व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानचा सूड घेण्याच्या तयारीला लागायला हवे असे म्हटले आहे.