सकारने जनतेला गाजर दाखवले आता सरकारला धडा शिकवायला पाहिजे . – विठ्ठलराव लंघे

नेवासा – गरीब जनतेला न्याय देण्यासाठी शरद पवार यांचे हात बळकट करायचे असल्याचे विधान  नेवासा तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांच्या निवड प्रसंगी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेवासा तालुक्याच्या 18 सेलच्या अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच विद्यार्थी , युवक तालुका अध्यक्ष सदस्यच्या निवडीचे पञ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष  आमदार चंद्रशेखर घुले पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, विठ्ठलराव लंघे , नेवासा तालुका अध्यक्ष काशिनाथ आण्णा नवले यांच्या हस्ते देण्यात आले . यावेळी युवक कार्यकर्तेनी आपले मनोगत व्यक्त केले डाँ संतोष तागड बोलताना विकृती आणि प्रकृती ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करुन भविष्यात पक्षाचे माध्यमातून सर्व सामान्य जनतेचा विकासासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज आहे असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.या निवडप्रसंगी वसंतराव देशमुख , दादासाहेब गंडाळ, अशोक चैधरी, दात्ताञय खाटीक, नामदेव निकम, आभिजीत देशमुख, पंजाब शिंदे , प्रवीण लंघे , सुनिल गव्हाणे आदी उपस्थित होते.