औरंगाबाद : पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने ई-बस खरेदीचा निर्णय घेतला आहे. परंतु पुरेसा निधी नसणे व ई-वाहनांसाठी प्रतीक्षा यादी वाढल्यामुळे आता मुंबईतील ‘बेस्ट’कडून ई-बस उसण्या घेण्यात येणार आहेत. येत्या काही महिन्यात पाच पर्यटक ई-बस शहरात दाखल होण्याची शक्यता आहे.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत गेल्या महिन्यात महापालिकेचे प्रशासक, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्याधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली होती. या बैठकीत मंत्र्यांनी औरंगाबादचे पर्यटन महत्त्व लक्षात घेऊन वातानुकूलित ई-बस खरेदीचे आदेश दिले होते. पर्यटन मंत्र्यांच्या आदेशानुसार स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने बस खरेदीसाठी प्रयत्न सुरू केले, पण त्यात निधीचा अडथळा त्यात आला. बारा मीटर लांबीची एक बस खरेदी करण्यासाठी सुमारे दीड ते पावणे दोन कोटी रुपये खर्च येतो. याशिवाय तिच्यासाठी चार्जिंग सेंटर तयार करावे लागणार आहे. स्मार्ट निधी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे उपलब्ध निभीचा विचार करता ई-बससाठी निधी काढणे शक्य नाही. बेस्टच्या पाच बस देण्यास आदित्य ठाकरेंनी तत्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच ई-बस शहरात दाखल होतील.
महत्वाच्या बातम्या
- ग्रामसेवक शिंदे यांच्या आत्महत्येचे जिल्हा परिषदेत पडसाद
- मराठा समाजाच्या नाराजीसमोर MPSC ची माघार, तर शासनावर फोडलं खापर
- औरंगाबाद शहर विकासासाठी सज्ज : आयुक्त
- ‘सरकार गोट्या खेळतय का ? वेळकाढूपणा खपवून घेणार नाही’
- एमआयएमसोबत भविष्यात समझोता नाहीच-प्रकाश आंबेडकर