राम मंदिराचा प्रश्न सोडविण्यासाठी आता मोदींनी पुढाकार घ्यावा : निर्मोही आखाडा 

RamMandir

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता पुढाकार घेऊन सर्वांना एकाच व्यासपीठावर आणून राममंदिराचा प्रश्न निकाली काढावा असं आवाहन आयोध्येतील निर्मोही आखाड्याचे महंत रामदास यांनी केलं आहे.  एमआयटी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

mahant ramdas

अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी-बाबरी मशीद या विवादास्पद जागेबद्दल अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी  एमआयटीचे डॉ. विश्वनाथ कराड, अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी विषयीचे पक्षकार व अखिल भारतीय श्रीपंच रामनंदीय निर्वाणी अनी आखाडा हनूमान गढीचे प्रमुख महंत धर्मदास, श्रीराम जन्मभूमीचे पक्षकार व निर्मोही आखाड्याचे प्रमुख रामदास, विद्याचलदास, योगीराज स्वामी, गिरिजेश त्रिपाठी आदी उपस्थित होते.

नेमकं काय म्हणाले महंत रामदास?

अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा वाद मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. यामुळे भारतातील सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक जीवनावर विपरीत परीणाम होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता पुढाकार घेऊन सर्वांना एकाच व्यासपीठावर आणून राममंदिराचा प्रश्न निकाली काढावा.अध्यात्मिक धर्मगुरू तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता असून फक्त विवादित 2.77 एकर जागा नव्हे तर आजूबाजूची 67 एकर जमीन राम मंदिरासह सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळ, अभ्यासिका तसेच संग्रहालय त्या ठिकाणी उभारण्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.Loading…
Loading...