‘या’ कारणासाठी आता मनसेही घेणार राज्यपालांची भेट

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. त्यानंतर राज्यातील शेतकरी आपल्याला सरकारची मदत कधी मिळणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावेत, म्हणून आता मनसेचे बाला नांदगावकर यांच्या नेतृत्त्वात इतर सदस्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. या भेटीत ते शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार आहेत. त्यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोश्यारी यांची भेट घेत राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती दिली होती. तसेच या शेतकर्यांना तातडीने मदत करण्यासाठी निधी तत्काळ वितरित करावा यासाठी फडणवीस राज्यपालांना भेटले.

तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेकडून महाराष्ट्रात ओल्या दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांच्या आणि नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली जात आहे. दरम्यान राज्यपालांकडून ओल्या दुष्काळाने बाधित २ हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली गेलीये. प्रति हेक्टरी ८ हजार मदत तर फळबागांसाठी १८ हजार रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, हि मदत पुरेशी नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :