अबब… गणपती मूर्तिवर पण जीएसटी!

जीएसटीची झळ आता गणेश भक्तांना

पुणे : नुकताच लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) अनेक छोट्या मोठ्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. जीएसटी सामान्य नागरिकांसाठी न सुटणार कोड आहे.   जीएसटीची झळ आता गणेश भक्तांना सुद्धा सोसावी लागणार आहेत.
 1 जुलै पासून सम्पूर्ण देशात ‘एक देश ,एक कर ‘ जीएसटीच्या रूपात लागू झाला. सर्व राज्याच्या सहमतिने लागू झालेल्या  जीएसटीने गणेश भक्तांची झोप उडवली आहे. कारण गणेश मूर्तिवर सुद्धा जीएसटी लागणार आहे. बाप्पांच्या आगमनासाठी सर्व भक्तगण आतूर आहेत. विशेष म्हणजे भक्ति करण्यासाठीही जीएसटी मोजावा लागणार आहे. यावर्षी गणेशमूर्तिच्या किंमतीत 15 ते 20 टक्के वाढ होणार आहे. शाडू आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे दरात वाढ झाली आहे. त्यामुळे गणेशमूर्तिही महाग होणार आहेत.
येत्या 25 ऑगस्ट ला बाप्पांच्या आगमनाला सुरवात होत आहे. यावर्षी बाप्पांचे आगमन लवकर होत असल्यामुळे जागोजागी गणपती स्टाल लागायला सुरवात झाली आहे. अनेक  मात्र यावर्षी भक्तांना जीएसटीचा फटका बसणार आहे. मूर्ति बनवण्यासाठी लागणाऱ्या शाडू आणि प्लास्टरवर 1 जुलैपासूनच जीएसटी लागू झाला आहे. त्यामुळे मूर्तिकारांनी मूर्तीचे दर 15 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहेत.
मूर्ती बनविण्यासाठी लागणारा रंगावर,पीओपी, वाहतूक खर्चावर जीएसटीचा भार वाढल्यामुळे  भाविकांना पण मूर्तिवर जीएसटी भरावा लागणार आहे.
You might also like
Comments
Loading...