आता प्रवास विजयाकडेच, शरद पवारांच्या भेटीनंतर उर्मिला मातोंडकरचा विश्वास

blank

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेत्री आणि कॉंग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी शरद पवार यांची आज भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. उर्मिला मातोंडकर या गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत.

शरद पवार यांच्या भेटीनंतर उर्मिला मातोंडकर यांनी एक ट्वीट केले आहे त्यात त्यांनी ‘गुरुतुल्य आणि उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे माननीय पवार साहेब यांचे मार्गदर्शन लाभल्यावर आता हा प्रवास विजयाकडेच जाईल. माझ्या या लढ्याला बळकटी दिल्याबद्दल त्यांचे अनेक अनेक आभार ‘ अशा शब्दात शरद पवार यांचे आभार मानले आहे.

दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना उत्तर मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे.