मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ईडीच्या या कारवाईवरच आता शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut ) यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर जोरदार हल्ला केला आहे.
सतीश उके आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे काही अपराध असतील ,जमिनीचे व्यवहार चुकीच्या पद्धतीने केले असतील किंवा जमीन लुटली असेल, बळकावली असेल, त्यांनी कुणाला धमकी दिली असेल तर राज्याचे पोलीस तपास करतील. ईडीने खास येऊन तपास करावा आणि धाडी घालाव्यात असा हा गुन्हा नाही. कोणत्याही राज्याचे पोलीस अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करतात. हा राज्यांतील पोलिसांवर सरळ सरळ अतिक्रमण आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
ज्या प्रकारे काश्मीरमध्ये अचानक अतिरेकी घुसतात. बॉम्ब हल्ले करतात आणि निघून जातात. त्याच प्रकारे या केंद्राच्या अतिरेकी कारवाया होत आहेत. ईडीला राज्यात घुसवलं जातं आणि ते अटक करून निघून जातात. यातून संघर्ष निर्माण झाला तर केंद्र आणि राज्य हा संघर्ष फार मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. म्हणून ममता बॅनर्जी यांनी गैरभाजप शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्रं पाठवलं असून त्यांनी हे पत्रं याच भूमिकेतून लिहिलं आहे. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिमा धुळीस मिळाली आहे. आता रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपास सीबीआय आणि ईडीकडून करण्याचीच तेवढी गरज आहे. असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
“…पण वराती मागून घोडं आलं तर उपयोग काय?”, भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा