आता सर्व मंत्र्यांनी भाजपला उत्तर देण्याची वेळ आलीय; भास्कर जाधव आक्रमक

आता सर्व मंत्र्यांनी भाजपला उत्तर देण्याची वेळ आलीय; भास्कर जाधव आक्रमक

मुंबई : भाजपकडून आघाडीतील मंत्र्यांचे घोटाळे काढले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यातील सर्वच मंत्र्यांना भाजपला प्रत्युत्तर दिलं होतं. राऊतांपाठोपाठ शिवसेना नेते भास्कर जाधव यांनीही भाजपला सर्वच मंत्र्यांनी प्रत्युत्तर देण्याची वेळ आल्याचं म्हटलं आहे. भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य आहे.

सर्व मंत्र्यानी आता उत्तर देण्याची वेळ आली आहे. कारण केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यासाठी लागल्या आहेत. शिवाय केवळ मराठी अधिकाऱ्यांना सातत्याने टार्गेट केलं जातं आहे. धक्कादायक म्हणजे या होऊ घातलेल्या धाडी आणि त्यांच्या तारखा भाजपचे नेते आधी सांगत आहेत. त्यामुळे याचा अर्थ असा होता की यंत्रणा भाजपसाठी काम करत आहेत? असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरही प्रतिक्रिया दिली आहे. नांदेडला पोटनिवडणूक लागली आहे. त्याठिकाणी निवडणूक जिंकण्यासाठी ते काहीही करतील, असं त्यांनी म्हटलं आहे. 2014 पूर्वीची भाजपची आंदोलनं पाहिली तर लक्षात येईल की हे डोक्यावर सिलेंडर घेऊन जायचे. त्यावेळी प्रत्येकवेळी म्हणायचे कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा. आता वेळ आली आहे म्हणायची ‘कुठे नेवून ठेवला आहे भारत माझा’, असा टोला त्यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या