‘आता फक्त अपेक्षा एवढीचं की, जेव्हा तुमच्या चौकशा सुरु होतील तेव्हा रडू नका’

sudhir mungantiwar

टीम महाराष्ट्र देशा : मागील सरकारच्या काळात झालेल्या वृक्ष लागवडीची सरकारकडून चौकशी करण्यात येणार असल्याच्या बातम्या काही दिवसापूर्वी आल्या होत्या. आता तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. ते आज ABP माझाच्या माझं व्हीजन कार्यक्रमात बोलत होते.

वृक्षलागवडीलसारख्या ईश्वरी कार्याच्या चौकशीच्यामार्गे काहीतरी करायला जायचं आणि टपली मारुन जायचं असा विचार करु नका. याद राखा, खबरदार तुम्ही आम्हाला इतरांसारखं समजाल तर ‘ये तो आग से खेल हैं’ असा धमकी वजा इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Loading...

‘तुम्ही स्वत: ईडीची चौकशी लागली तर रडायचं काम करता, आमच्यासाठी हे राजकारण असल्याचं म्हणायचं, पण आम्ही रडणारे नाही. जर तुम्ही चौकशी करत असाल तर फक्त वन सचिवांकडून नाही तर उच्च न्यालयाच्या न्यायाधीशांकडून करा. आता मीही पाहतो सरकारमध्ये किती दम आहे , असं वक्तव्य माजी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.

वृक्षलागवडीवर आमची चौकशी लावत आहात पण तुमच्या चौकशा लागल्या तर घाबरु नका अस वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. वृक्षलागवडीसारख्या ईश्वरी कार्यावर शंका घेणारे तुम्ही कोण? ज्यांनी झाडाचं कलम सोडाच साधं एक पान देखील लावलं नाही, त्यांनी शंका कशासाठी घ्यावी, असा थेट सवाल मुनगंटीवारांनी सरकारला केला आहे.

त्यांना फक्त आम्ही केलेला विकास खुपतो असही ते म्हणाले. ‘आता फक्त माझी अपेक्षा एवढीचं की, जेव्हा तुमच्या चौकशा सुरु होतील तेव्हा रडू नका’ असा थेट इशारा मुनगंटीवारांनी ठाकरे सरकारला दिला आहे. तर भाजप सरकारच्या काळातील वृक्षलागवडीची चौकशी करुन दाखवाच असं आव्हानही मुनगंटीवार यांनी सरकारला दिलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका