fbpx

‘आता सरकारवर टीका करण हा गुन्हा झाला आहे’

Ajit pawar at shrigonda

टीम महाराष्ट्र देशा – आता या सरकारवर टीका करण हा गुन्हा झालेला आहे. अशी परिस्थिती आणीबाणीच्या काळात नव्हती.आताच्या काळात सरकारवर टीका केली तर तुमच्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल होतो. ही स्वातंत्र्याची मुस्कटदाबी नाही का?, असा प्रश्न उपस्थित करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर कडाडून टीका केली.

राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेच्या निम्मिताने अजित पवार अमरावती येथे बोलत होते. त्यावेळी त्यांनी सरकार कशाप्रकारे सर्वसामन्य जनतेची मुस्कटदाबी करत आहे. अशी परिस्थिती आणीबाणीच्या काळात नसल्याचे सांगत सरकारवर टीका केली.

यावेळी पवार म्हणले की, घटनेने सर्वांना काही स्वातंत्र्ये दिली आहेत. त्यामाध्यमातून आपल्यला आपली आपली भूमिका मांडत असतो. परंतु ते आता घडत नाही, सरकार आता घटनेच्या विरोधात वागत आहे. या सरकारने सगळे नियम बासनात गुंडाळून ठेवले आहेत. सर्व स्वायत्त संस्थांमध्ये या सरकारचा हस्तक्षेप आहे.

आताच्या काळात सरकारवर टीका केली तर तुमच्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल होतो. ही स्वातंत्र्याची मुस्कटदाबी नाही का?, असा प्रश्न उपस्थित करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर कडाडून टीका केली.