आता पश्चिम बंगाल मध्ये गुंतवणूक करा, महाराष्ट्राची क्षमता संपली

टीम महाराष्ट्र देशा: आता पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक करा महाराष्ट्राची क्षमता संपली आहे. असे आवाहन  ममता बॅनर्जी यांनी बंगाल आंतरराष्ट्रीय उद्योग परिषदेत केले आहे. उद्योगांनी गुंतवणुकीसाठी भारतातील इतर राज्यांचा विचार करावा. महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी आहे, या गोष्टीचा मी पूर्णपणे आदर करते. मात्र, आता त्या राज्याची क्षमता संपुष्टात आली आहे.

पश्चिम बंगालच्या सीमेला लागून बांगलादेश, नेपाळ, भुतान हे देश आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होऊ शकतो, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारलाही चिमटे काढले. आमच्या राज्यात भेदभाव आणि दहशतीला थारा नाही. याठिकाणी तुम्हाला प्रेम आणि आपुलकीचा अनुभव येईल. पश्चिम बंगाल कोणाचाही हक्क हिरावून घेणार नाही, याची शाश्वती मी तुम्हाला देते. आम्हाला देशाची एकता आणि सहिष्णुता प्रिय आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल गुंतवणुकीसाठी आदर्श ठिकाण ठरू शकते, असे त्यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...