आता इन्स्टाग्राममध्ये ‘जिओस्टीकर्स

इन्स्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी ‘स्टोरीज’मध्ये जिओस्टीकर्स वापरण्याची सुविधा देणार आहे. या अंतर्गत विविध शहरांमध्ये राहणारे वा तेथे असणारे युजर हे त्या शहराच्या विविध विख्यात स्थळांशी संबंधीत आकर्षक स्टीकर्स आपल्या स्टोरीजमध्ये वापरू शकतील. सर्वात महत्वाचे म्हणजे युजर जिथे आहे. त्या परिसरातील युजर्स नेमके काय शेअर करत आहेत? याची माहितीदेखील एका ठिकाणी मिळणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात न्यूयॉर्क आणि जकार्ता या महानगरांसाठीचे जिओस्टीकर्स प्रदान करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये जगभरातील विख्यात शहरांचे जिओस्टीकर्स सर्व युजर्सला टप्प्याटप्प्याने प्रदान करण्यात येतील.