अभिनेता अक्षय कुमारची पंतप्रधान सहाय्यता निधी नंतर आता BMCला मदत

महाराष्ट्र देशा टीम : कोरोना व्हायरसच्या या युद्धात सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे आले आहेत. उद्योगपती रतन टाटा, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांनीही कोरोनाविरोधातल्या लढाईत आपलं योगदान दिलं आहे. काही कलाकारांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदत केली आहे तर अनेकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत देऊ केली आहे.

अभिनेता अक्षय कुमार यानं पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी २५ कोटींची मदत केल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेला तीन कोटींची मदत देऊ केली आहे. जगातील अनेक देश करोना व्हायरसशी दोन हात करत आहेत. करोनाला थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. मुंबईची लोकसंख्या पाहाता मोठ्या प्रमाणावर लोकांची चाचणी करणं हे आवाहन आहेत. यासाठी टेस्टींग किट्स आणि मास्क कमी पडू नयेत यासाठी अक्षयनं पालिकेला ही तीन कोटींची मदत केली आहे. असे वृत्त मटा वृत्तपत्राने दिले आहे.

याआधी अक्षय कुमारने प्रधानमंत्री सहायता निधीला २५ कोटी रुपयांची मदत केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहायता निधीमध्ये मी २५ कोटी रुपये देत आहे. चला आयुष्य वाचवूया. जान है तो जहाँ है, असं ट्विट त्याने केलं होत. त्यानंतर पंतप्रधान मोदींनीही त्याच कौतुक केलं होत.