आता प्रसिद्ध कॉमेडियन भरती सिंह आणि पती हर्ष ‘एनसीबी’च्या रडारवर

हर्ष

मुंबई :  एनसीबी कडून आज सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. प्रसिद्ध कॉमेडियन भरती सिंहच्या घरी आज एनसीबी ने छापा मारला आहे. एनसीबीने भारतीच्या घरी छापा मारला असून, भारती आणि हर्ष यांचे अमली पदार्थ सेवन प्रकरणात काय कनेक्शन आहे हे अद्यापही समोर आलेले नाही. एनसीबीच्या कारवाई दरम्यान भारती आणि हर्षचे नाव समोर आले होते. दरम्यान आज एनसीबीने याच चौकशीसाठी भारती आणि हर्षच्या घरी छापा मारला आहे.

दरम्यान बॉलिवूड अभिनेता ‘अर्जुन रामपाल’च्या देखील राहत्या घरी देखील एनसीबीने छापा टाकला होता. तर यातच अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सला एनसीबीने समन्स बजावलं होते. तर  तिला चौकशीसाठी देखील बोलवण्यात आले होते.

अभिनेता सुशांत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. तेव्हापासून एनसीबीकडून बॉलिवूडमधील अमली पदार्थ सेवन शोधून काढण्याचे काम सुरुच आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आजच्या कारवाईत बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध कॉमेडियन भरती सिंह आणि पती हर्षला समन्स बजावण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या