आता तरी मराठ्यांना पण कळालं पाहिजे तलवारी कधी काढायच्या आणि तह कधी करायचा – निलेश राणे

blank

मुंबई : मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी फडणवीस सरकारनं सुरू केलेल्या ‘सारथी’ संस्थेबाबतचे वाद शमता शमत नाहीत. आज या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे यांच्यासह मराठा क्रांतीचे समन्वयक व वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बैठक आयोजित केली गेली होती.

मात्र, या बैठकीमध्ये गोंधळ झाल्याने स्वतः खासदार छत्रपती संभाजी राजे यांना मी बाहेर जाऊ का असे उद्गार काढावे लागले. सारथी व मराठा समाजातील अनेक प्रश्नांवर हि बैठक मंत्रालयात आयोजित केली गेली होती. या बैठकीत छत्रपती संभाजीराजे यांना मंचावर न बसवता तिसऱ्या रांगेत बसवल्याने मराठा समन्वयकानी नाराजी व्यक्त केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

छत्रपती खाली बसणार असतील तर आम्ही बाहेर लोकांना काय तोंड दाखवायचं असा भावनिक प्रश्न उपस्थित करून मंचावर बसण्याची विनंती समन्वय समितीतील सदस्यांनी केली, जेणेकरून कोणताही वाद निर्माण होणार नाही. मात्र, छत्रपती संभाजीराजे यांनी अत्यंत विनम्रपणे मी एक सदस्य म्हणून या बैठकीला आलो आहे व मान-अपमासाठी आलो नसून सारथीवरील प्रश्नांवर दाद मागायला आलो आहे असे देखील सांगितले.

मात्र या नंतर भाजप नेते निलेश राणे यांनी यावरून संताप व्यक्त करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार घणाघात केला आहे. ‘सारथी संस्थेला भरीव आर्थिक निधीची मागणी मराठा समाज सातत्याने करतोय. या बैठकीला संभाजीराजेना तिसऱ्या रांगेत बसण्याचं कारण या सरकारला एवढा माज आलाय कि त्यांना इतरांची किंम्मत कळत नाही. निषेध करतोच पण मराठ्यांना पण कळलं पाहिजे तलवारी कधी काढायच्या आणि तह कधी करायचा’. अस निलेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, सारथी संस्थेला उद्या आठ कोटींची मदत, करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे तर मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत देण्याचा प्रयत्न असल्याचे देखील अजित पवार म्हणाले.

कोल्हापूर, सांगली, सातारा भागातील संभाव्य पूरपरिस्थितीसंदर्भात कर्नाटकच्या जयंत पाटील यांची बैठक

मानखुर्द मशीदीवरील बेकायदेशीर भोंग्याविरोधात विहिंप शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

‘राष्ट्रीयत्व, धर्मनिरपेक्षता व नागरिकत्व या विषयांवरील धडे अभ्यासक्रमातून वगळण्याचा सीबीएसईचा निर्णय उघड राष्ट्रद्रोह’