आता दिव्यांग,कोविडबाधितांना देखील करता येणार मतदान

evm

अमरावती – महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दिव्यांग व्यक्ती आणि कोविडबाधित मतदारांसाठी टपाली मतपत्रिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, यासाठी दि. 22 नोव्हेंबर पूर्वी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार यांनी दिली.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी दि. 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यातील दिव्यांग व्यक्ती आणि कोविडबाधित मतदार आपले मत टपाली मतदानाने नोंदवू शकतील. टपाली मतपत्रिका मिळण्यासाठीचा नमूना 12 डी दि. 22 नोव्हेंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात देणे आवश्यक आहे.

अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यामधील संबंधित मतदारांस मत नोंदविता यावे, यासाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांना नमूना 12 डी मिळण्याची सुविधा करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या