होऊ द्या खर्च, आता पेट्रोल डिझेल मिळणार उधारीवर

मुंबई: दिवसेंदिवस वाढट असलेल्या पेट्रोल डिझेलच्या भावांमुळे सामान्य नागरिकांना दुचाकी चालवणेही आता महाग होत आहे. लागोपाठ सात दिवसांपासून दररोज पेट्रोलचे भाव वाढत आहेत. दरम्यान, वाढती महागाई आणि इंधानाच्या वाढत्या किंमतीमधून दिलासा देणारी बातमी आहे, ती म्हणजे पेट्रोल डिझेल उधारीवर मिळणार असल्याची.

ग्राहकांना पेट्रोल डिझेल उधारीवर देण्यासाठी श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्यामध्ये करार करण्यात आला आहे. या अंतर्गत हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पंपांवर ग्राहकांना पेट्रोल-डिझेल उधार मिळणार आहे.

काय आहे योजना
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार लोन देण्यात येणार आहे, लोन घेणाऱ्या ग्राहकांच्या मोबाईलवर ओटीपीच्या मार्फत लोन देण्यात येईल. लोन घेतल्यापासून पुढील ३० दिवसांत ते फेडावे लागणार आहे. लोनवर पेट्रोल-डिझेल भरल्याने ग्राहकांना लॉयल्टी पॉईंट आणि विम्याची सुविधाही मिळणार असल्याचं हिंदूस्तान पेट्रोलियमनं सांगितलं आहे.Loading…
Loading...