fbpx

कॉंग्रेस करणार गोव्यात सत्ता स्थापनेचा दावा

rahul gandhi

बंगळुरू : कर्नाटक मध्ये सत्तासंघर्ष आता टोकाला पोहचला आहे.कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर आज सकाळी ९ वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.

सुप्रीम कोर्टात मध्यरात्री दोन ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

दरम्यान आता कर्नाटकात सर्वात जास्त सदस्य निवडून आणणाऱ्या पक्षाला म्हणजे भाजपाला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी बोलावल्यानंतर आता कॉंग्रेस गोव्यामध्ये सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. गोव्यामध्ये काँग्रेसला इतर पक्षांपेक्षा सर्वात जास्त म्हणजे 16 जागा मिळाल्या होत्या.काँग्रेसने आता गोव्यात 16 आमदारांच्या पत्रांसह राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करण्याचे निश्चित केले आहे. त्याबरोबरच मणिपूर आणि मेघालयामध्येही काँग्रेस असा दावा करणार असल्याची चर्चा आहे.