आता येणार शेणापासून बनवलेले इको-फ्रेंडली ‘वैदिक पेंट’ !

वैदिक पेंट

नवी दिल्ली: जुन्या काळामध्ये लोक मातीच्या घरांमध्ये राहत त्या घरांना शेणा मातीने सारवत. आधुनिक काळात घरे सिमेंट कॉन्क्रीट ची बनली आणि लोकांचा शेण काय तर मातीशी देखील संपर्क येणे बंद झाले. त्यामुळे शेणाने सरावन्या ऐवजी भिंतींना डिस्टेंपर, इमल्शन आणि प्लास्टिक पेंट दिला जातो. मात्र आता खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने शेणापासून बनवलेलं एक इको-फ्रेंडली ‘वैदिक पेंट’ आणलं आहे.

खादी इंडिया चे हे पेंट शेणापासून बनवलेले असून देखील दुर्गंधी विरहित आहे. तर यामध्ये डिस्टेंपर किंवा पेंट प्रमाणे यामध्ये हानिकारक विषारी पर्दार्थ देखील नाहीत. तर शेणापासून बनवलेले असल्याने यामध्ये एंटी-वायरल प्रॉपर्टीज आहेत. कोरोनाच्या काळात लोकांचा कल एंटी-वायरल टूथब्रश पासून लेमिनेट्स पर्यंत वाढला आहे. त्यामध्ये या पेंटला देखील लोकांचा प्रतिसाद मिळेल.

भारतीय मानक ब्यूरो (BIS) ने देखील या पेंटला प्रमाणित केल आहे. देशातील तीन मोठ्या प्रयोग शाळांमध्ये ‘नेशनल टेस्ट हाउस’ मुंबई आणि गाजियाबाद तसेच श्री राम इंस्टीट्यूट फॉर इंडस्ट्रियल रिसर्च, नवी दिल्ली येथे याचे परीक्षण झाले आहे. एमएसएमई मंत्रालय च्या सांगण्यानुसार ‘खादी वैदिक पेंट’ ची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्याच्या संकल्पनेला अनुरूप आहे. खादी आणि मोद्योग आयोगाचे चेयरमन विनय कुमार सक्सेना यांनी मार्च 2020 हि संकल्पना मांडली तर जयपुरचे कुमारप्पा नेशनल हैंडमेड पेपर इंस्टीट्यूट ने याला विकसित केल.

वेदिक पेन्टचे फायदे –
या पेन्टचे आठ फाये सांगितले जात आहेत. यामध्ये हे पेंट एंटी बैक्टीरियल आहे, एंटी फंगल, इकोफ्रेंडली, उन्हाळ्यात हे पेंट थंडावा निर्माण करते, हेवी मेटल नाही, नॉन टॉक्सिक, तर हे पेंट सामान्य पेंट पेक्षा स्वस्त असणार आहे. तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. टेक्नोलॉजी ट्रांसफरच्या माध्यमातून याच्या स्थानीक मैन्युफैक्चरिंगला प्रोत्साहन दिले जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या