आधी छोटे नेते म्हणाले आणि आता चंद्रकांतदादांनी केलं शरद पवारांचं तोंडभरून कौतुक

chandrakant patil and sharad pawar

पुणे : राज्यात पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुका जवळ आल्या आहेत. १ डिसेंबर रोजी राज्यातील विविध विभागात मतदान होणार असून महाविकास आघाडी विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीसाठी भाजपचं कडवं आव्हान असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

या प्रचाराच्या रणधुमाळीत पुण्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर देखील अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली होती. ‘राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर समजले की, ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो,’ अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

मात्र आज त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये यासंदर्भात खुलासा केला आहे. ते वक्तव्य व्यक्तिगत त्यांच्याबाबत नव्हतं, तर सर्वांबद्दल होतं असं म्हटलं आहे. तसंच आपण शरद पवारांवर पीएचडी करत असल्याचं ते म्हणाले आहेत. शरद पवारांचं स्वत:भोवती राजकारण फिरवत ठेवण्याचं कौशल्य खरोखर मोठं आहे असं म्हणत त्यांनी कौतुक केलं आहे.

चंद्रकांत पाटलांच्या विधानानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनि सडकून टीका केली होती. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील पवारांवरील टीकेवर नाराजी व्यक्त केली होती. चंद्रकांत पाटील यांनी पवारांच्या नेतृत्वाच व अभ्यासाचं आज तोंडभरून कौतुक केलं आहे. ‘शेती, साखर या गोष्टीत शरद पवारांचा आहे तितका अभ्यास कुणाचा नाही. शरद पवारांबद्दल मी अनेकदा गौरवोद्वार काढले,’ असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या