परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आता ‘चक्का जाम’ आंदोलन

Sanjay Jadhav

परभणी : जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्याची अनेक वर्षांपासून मागणी असूनही ती अद्याप मंजूर झालेली नाही. त्यातच सध्या राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असतांनाही वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे शिवसेना परभणीच्या वतीने या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात स्वाक्षरी मोहिम आणि धरणे आंदोलन करण्यात आले आहे. तर आता दुसऱ्या टप्प्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.

परभणीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे या मागणीसाठी शहरातील बी. रघुनाथ सभागृहात सर्वक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये जिल्हाभर चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वडपुडकर, विजय वाकोडे, विजय जामकर आदींची उपस्थिती होती.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी उपोषण करण्याचा इशारा खासदार संजय जाधव यांनी आधी दिला होता. मात्र, आंदोलनानंतर उपोषण रद्द करण्यात आले होते. मात्र, आता जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे खासदार जाधव यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या