आता सीबीएसई व आयसीएसईच्या दहावी, बारावीच्या परीक्षा पण रद्द

exam

नवी दिल्ली : जगात आणि आता त्यानंतर देशात कोरोनाची संख्या वाढत आहे. राज्यात देखील ऐन परीक्षेच्या काळात कोरोनाचा शिरकाव झाला. कोरोना व लॉकडाउनचा शैक्षणिक क्षेत्राला फटका बसला असून अनेक परीक्षा या रद्द कराव्या लागत आहे. राज्यातील शालेय परीक्षांबरोबरच सीबीएसई बोर्डाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आयसीएसई बोर्डानंही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली.

देशातील करोना परिस्थितीत सुधारणा होत नसल्यानं या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सीबीएसईच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुधारित वेळापत्रकानुसार सीबीएसई बोर्डानं दहावी-बारावीच्या परीक्षा १ ते १५ जुलैदरम्यान घेण्याचे निश्चित केलं होतं.

केंद्राचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली कि, १ ते १५ जुलै दरम्यान घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांना मागील तीन वर्गात मिळालेल्या गुणांचं मूल्यमापन करून मूल्यमापन केलं जाणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचं मंडळानं दिलेल्या गुणांवर समाधान होणार नाही, त्यांनी नंतर बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा देऊ शकतात.

सीबीएसईबरोबरच आयसीएसई बोर्डानंही दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली. मात्र, बोर्डानं दिलेल्या गुणांवर समाधान न झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास बोर्डानं नकार दिला आहे, असंही मेहता म्हणाले.

दिल्ली, महाराष्ट्र व तामिळनाडू या राज्यांनी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात असमर्थता दर्शविली होती, असं तुषार मेहता यांनी सांगितलं. त्यावर सीबीएसईनं बारावीच्या परीक्षेसंदर्भात नव्यानं सूचना जारी करावी, तसेच राज्य मंडळांच्या परीक्षांच्या स्थितीसंदर्भातही उत्तर दाखल करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. या याचिकेवर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.

कोरोनाची दहशत : येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीची यात्रा रद्द

क्रिकेट : कोरोनाच्या धास्तीने भारत-आफ्रिका वनडे मालिका रद्द

राजस्थानमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ; आजपासुन राज्याच्या सीमा बंद