आता भाजपला मेगा उतरतीकळा; नवाब मलिकांची जहरी टीका

navab malik

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्षांमधून दिग्गज नेते गेले. तसेच ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरामुळे राष्ट्रवादी-कॉंग्रेसमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले होते.

तसेच निवडणुकीपूर्वी मेगाभरती करणाऱ्या भाजपला आता मेगा उतरतीकळा लागणार आहे, अशी जहरी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक केली आहे. ते शनिवारी माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना मलिक यांनी भाजपवर आरोप देखील केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, निवडणुकीआधी भाजपने राष्ट्रवादीच्या आमदारांना धमकावले होते तसेच आमिष दाखवले होते. आता हे आमदार पुन्हा पक्षात येण्याच्या तयारीत आहेत, असा गौप्यस्फोट देखील नवाब मलिक यांनी केला. ‘राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे संयुक्त सरकार आल्याने भाजपचे डझनभर आमदार लवकरच पक्षातून बाहेर पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडून गेलेले आणि भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या आमदारांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या आमदारांना पक्षात प्रवेश देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले, असे मलिक म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :