आता भाजप ऍक्शन मोडमध्ये; अनिल परब यांच्याविरोधात याचिका दाखल करण्याचं काम सुरु

anil parab vs bjp

सांगली : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यात राजकीय रणकंद सुरु आहे. राणेंच्या टीकेनंतर राज्यभर त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. सेना-भाजपच्या नेत्यांमध्ये टीकांचे धारदार बाण एकमेकांवर सोडले जात आहेत.

नारायण राणेंना पोलिसांनी अटक देखील केली होती. तर राणेंची अटक ही पोलिसांवर दबाव टाकून करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. याप्रकरणी सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भाजपकडून करण्यात येत असून परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात तक्रार करण्याची तयारी देखील भाजपने सुरु केली आहे.

‘अनिल परब यांच्याविरोधात याचिका दाखल करण्याचं काम सुरु आहे. कायद्याच्या दृष्टीनं केसेस दाखल होत आहे. नाशिक युनिटने चार केसेस दाखल केल्या आहेत. आपल्याला वकिलांची तगडी फौज निर्माण करायची आहे,’ असं भाष्य भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत केलं आहे.

‘महाविकास आघाडीतील तीन पक्षांची आता शेवटची तडफड सुरु आहे’

‘हे सरकार पोलीस आणि गुंडांच्या जोरावर चाललंय. महाविकास आघाडीतील तीन पक्ष आता शेवटची तडफड करत आहेत. आम्ही तुटू फुटू असं त्यांना वाटतंय. पण आम्ही सुद्धा संयमाने एक एक बॉम्ब टाकतो आणि गायब होतो,’ असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या