Bhim App- ‘भीम’ अॅप आता मराठीत

‘भीम’ (भारत इंटरफेस फॉर मनी) अॅप आता मराठीतही उपलब्ध झालं आहे. नॅशनल पेमेंट्स काऊन्सिल ऑफ इंडियाने ‘भीम’ अॅपचं अपग्रेड व्हर्जन लॉन्च केलं. ‘BHIM 1.3’ हे नवं व्हर्जन अँड्रॉईड आणि आयओएस यूझर्ससाठी असून, तीन नवीन फीचर्सचा यात आहेत.  

  • ‘भीम’ अॅपमध्ये  तीन प्रादेशिक भाषा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये मराठी, पंजाबी आणि असमी भाषांचा नव्याने समावेश आहे.

 

  • भीम’ अॅप वापरणारे आता बेनिफिशियरी निवडीसाठी आपल्या फोनमधील काँटॅक्टचा वापर करु शकतात.

 

  •  नॅशनल पेमेंट्स काऊन्सिल ऑफ इंडियाने ‘भीम’ अॅपच्या अपग्रेडेड व्हर्जनमध्ये QR कोडचा पर्यायही समाविष्ट केला आहे.