Share

Aravind Sawant। “आता मशालीची धग सहन करा”; बाळासाहेब ठाकरे यांचं ३८ वर्ष जुनं व्यंगचित्र व्हायरल

मुंबई : निवडणुक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्हं गोठवल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू असतानाच शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी ३८ वर्षांपूर्वी काढलेलं व्यंगचित्र ट्विट करत शिंदे गटाला टोला लगावला आहे. दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्ह मिळणार नाही, असे आदेश आयोगाने दिले होते. उद्धव ठाकरे गटाला  ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव दिलं असून चिन्ह ‘मशाल’ दिलं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’असं दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर अरविंद सावंत यांनी हे व्यंगचित्र पोस्ट केलं आहे.

हे चित्र बाळासाहेब ठाकरे यांनी १९८४ मध्ये काढलं होतं. “कमळ दिलं त्यावेळी सुखावलात आता मशालीची धग सहन करा” अशा इशारा त्यांनी या व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजपाला दिला होता. आता पुन्हा एकदा तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे आणि भाजपामध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे. भाजपनेच शिवसेना फोडली असल्याचे आरोप रोज केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर सावंत यांनी केलेल्या ट्विटची बरीच चर्चा रंगलेली आहे.

पक्षाचं नवीन नाव आणि निवडणूक चिन्हाबाबत विचारलं असता अरविंद सावंत म्हणाले की, ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव आम्हाला मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे. कारण आमच्या पक्षाला नवीन चेहरा मिळाला आहे. आम्हाला ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. त्यामुळे आता आम्हाला मास्क लावावा लागणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या नावात ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशी तिन्ही नावं आहेत.

दरम्यान, निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटो सोबतच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार, असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : निवडणुक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्हं गोठवल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू असतानाच शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now