एफटीआयआयच्या अध्यक्षपदी अनुपम खेर यांची वर्णी

जेष्ठ चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांची एफटीआयआयच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी गजेंद्र चव्हाण हे एफटीआयआयचे संचालक होते. मात्र गजेंद्र चव्हाण यांच्या निवडीपासूनच संपूर्ण कारकीर्द मोठी वादग्रस्त ठरली होती.

अनुपम खेर यांनी आजवर ५०० हून अधिक चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत. ते नामवंत निर्माता, अभिनेता व शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांनी या आगोदर सेन्सोर बोर्ड आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या नामांकित संस्थेचे संचालक पद भूषविले आहे. अनुपम खेर यांना २००४ साली पद्मश्री तर २०१६ साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

दरम्यान अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर या चंडीगड मतदार संघातून भाजप खासदार आहेत. मागील काही काळापासून खेर यांनी घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनाच्या भूमिकेमुळे चर्चेत आले होते.

You might also like
Comments
Loading...