fbpx

अभिनेत्री ईशा देओलच्या कुटुंबामध्ये आता अजून एक सदस्य वाढणार

टीम महारष्ट्र देशा : बॉलीवूड अभिनेत्री ईशा देओल आणि  उद्योगपती भरत तख्तानी यांच्या कुटुंबां मध्ये आता अजून एक सदस्य वाढणार आहे. ईशाने सोशल मीडियावर मुलगी राध्या हीचा फोटो पोस्ट केला आहे. त्यात तिच्याजवळ एक टॅग दिसत असून त्यावर मोठी बहिण म्हणून माझ प्रमोशन होत असल्याचं लिहील आहे.

ईशा आणि भरत यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली असून त्यांना राध्या नावाची दीड वर्षाची मुलगी आहे. आता दुसऱ्यांदा आई बाबा होणार असल्याने ईशा – भरत भलतेच खुश आहेत. सोशल साईटवर पोस्ट टाकून त्यांनी आपल्या घरी येणाऱ्या नवीन पाहुण्याबद्दल सांगितलं आहे. बॉलीवूडमध्ये फारशी चमकदार कामगिरी करू न शकल्याने ईशाने लग्नानंतर गृहिणी म्हणून राहणं पसंत केलं आहे. तर भरत हा उद्योगपती असून देशविदेशात त्यांच्या व्यवसायाचे जाळे पसरले आहे.