शेतकरी कर्जमाफी साठी आता आणखी एक निकष

Maharashtra CM Devendra Fadnavis

मुंबई : शेतकरी कर्जमाफी साठी निकषांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाही . प्रत्येक दिवशी सरकार कर्जमाफी साठी काहीतरी नवीन निकष जाहीर करत आहे . आज शेतकरी कर्जमाफी संदर्भात आणखी एक नवा निकष समोर आलाय. १०० टक्के शेतीवर उपजीविका असणा-यांनाच कर्जमाफी देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे .
ज्यांची उलाढाल १० लाख रुपयांवर आहे त्यांना या कर्जमाफीमधून वगळण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यांचा काहीतरी जोडव्यवसाय आहे त्यामुळे त्यांना वगळल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे केवळ शंभर टक्के शेतीवर उपजीविका असणा-यांनाच कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल आहे .