मुंबई : मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरण ताजे असतानाच मुंबईतील भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपला चांगलंच धारेवर धरलं. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सामनातून टीकेचे बाण सोडले आहेत.
मुंबई तर जगातील सर्ववात सुरक्षित शहर आहे. तरीही साकीनाका ते डोंबिवलीपर्यंत अबलांच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत. पुन्हा मध्ये बोरिवली भाजप कार्यालय लागतेच. हे सर्व भयंकर प्रकार एक प्रकारच्या मानसिक विकृतीतून घडत आहेत. ही विकृती मोडून काढावीच लागेल.
डोंबिवली प्रकरणाचा गवगवा सुरू असतानाच बोरिवली येथील भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेचा विनयभंग भाजप पदाधिकाऱ्याने केला. या प्रकरणात भाजपच्या सर्व ताई, माई, अक्का, भाऊ तोंडाला कुलूप ठोकून बसले आहेत, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर केली आहे.
भाजपच्या कार्यालयात ज्या महिलेचा विनयभंग झाला ती त्यांचीच कार्यकर्ती आहे. या पीडित महिलेनेही पोलिसांत गुन्हा दाखल करुन न्यायाची मागणी केली आहे. बोरिवली प्रकरणातही भाजपच्या ताई-माई-अक्कांनी डोळे ओले करायला हरकत नव्हती, पण त्यांनी साकीनाका, डोंबिवलीप्रकरणी अश्रूंना बांध मोकळा करून दिला. हे धोरण दुटप्पी आहे, असंही सामनाच्या अग्रलेखात संजय राऊत म्हणाले आहेत.
राज्यपालांना महाराष्ट्रातील अशा घटनांची चिंता वाटते व ते तत्काळ मुख्यमंत्र्यांशी पत्राचार करुन विशेष अधिवेशनाची सूचना करतात. अशा घटना दुर्दैवीच आहेत. पण समाजाचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. विकृतीने कळस गाठला आहे. त्यातून हे भयंकर गुन्हे घडत आहेत. महिला सुरक्षा, लैंगिक अत्याचाराबाबत कठोर कायदे होऊनही विकृतांकडून हे असले प्रकार घडतच आहेत. डोंबिवलीजवळील कल्याणमध्ये एका आठ वर्षांच्या बालिकेवर शिक्षकाकडूनच अत्याचार झाला. हे भयंकर प्रकार फक्त कायद्याने थांबतील अशी अपेक्षा करात येणार नाही. शेवटी समाजातील वाढत्या विकृतीचाही प्रश्न आहेच, असं राऊत यांनी म्हंटल आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शक्ती कायद्याने मंत्रिमंडळातील बलात्काऱ्यांना त्रास होईल याची ठाकरे सरकारला भीती’
- ‘ज्या माणसाने एका डॉक्टर महिलेला खोट्या केस मध्ये ५२ दिवस तुरुंगात ठेवलं, त्याने…’
- फलटण-सातारा-बेळगाव-बंगळुरू मार्गे महत्वाचा पुणे ते बंगळुरू हा नवा हरित महामार्ग – गडकरी
- सोमय्यांनी कोल्हापुरात यावं, पण कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य करु नये; मुश्रीफांची सोमय्यांना तंबी
- सोमय्यांबाबत पहिल्या दिवशी जे घडलं ते चुकीचं; खुद्द अजित पवार यांनी दिली कबुली