निरव मोदीनंतर आता ‘कनिष्क गोल्ड’ने लावला १४ बँकाना शेकडो कोटींचा चुना 

bhupesh-jain

नवी दिल्ली: हिरे व्यापारी निरव मोदीने पंजाब नशनल बँकेला १३  हजार ५४० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखीन एक घोटाळा समोर आला आहे. एका ज्वेलरी व्यापाऱ्याने भारतातील बँकांना चुना लावल्याचे उघड झाले आहे.

१४ बँकांमधील ८२४ कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने कनिष्क गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड (केजीपीएल) कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने केजीपीएलच्या संचालकांची चौकशीही सुरु केली असून, बुधवारीच केजीपीएलच्या ऑफिसवर छापे मारले होते.

जानेवारी महिन्यात सीबीआयकडे केजीपीएलविरोधात तक्रार आली होती. केजीपीएल आणि संचालक भूपेश कुमार जैन, पत्नी नीता जैन यांनी बँकांना फसवले असून, बनावट कागदपत्रे दिली असल्याचे. बँकांना आपल्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये आढळले आहे.

या बँकेने दिले आहे कनिष्क गोल्ड ला कर्ज 

 • एचडीएफसी २७ कोटी
 • बँक ऑफ बडोदा ३२ कोटी
 • सेंट्रल बँक २२ कोटी
 • बँक ऑफ इंडिया ४६ कोटी
 • आयडीबीआय ४९ कोटी
 • पंजाब नॅशनल बँक १२८ कोटी
 • एसबीआय २४० कोटी
 • सिंडिकेट बँक ५४ कोटी
 • यूनियन बँक ५३ कोटी
 • यूको बँक ४५ कोटी
 • कॉर्पोरेशन बँक २३ कोटी
 • तामिळनाडू मर्कंटाईल बँक २७ कोटी
 • आंध्र बँक ३२ कोटी
 • आयसीआयसीआय बँक २७ कोटी