fbpx

अमित शहांची बदनामी केल्याप्रकरणी गुजरात कोर्टाची राहुल गांधींना नोटीस

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणीत अजून वाढ झाली आहे. मोदी सरकारविरुद्ध वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी त्यांना निवडणूक आयोगाने दुसऱ्यांदा नोटीस पाठवली होती आणि आता अमित शाह प्रकरणातही त्यांना समन्स बजावण्यात आला आहे.

मध्य प्रदेशमधल्या जबलपूरच्या सभेमध्ये राहुल गांधींनी अमित शहा यांचा उल्लेख सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर प्रकरणी खून प्रकरणातले आरोपी असा केला होता. त्यावरून कृष्णवदन ब्रह्रभट या भाजपच्या एका कार्यकर्त्याने त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. त्यामुळेच त्यांना गुजरात कोर्टाने समन्स पाठवलं आहे.

दरम्यान, सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर प्रकरणी सीबीआय कोर्टाने अमित शहा यांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळेच राहुल गांधींनी त्यांचा खून प्रकरणातले आरोपी असा उल्लेख करणं चुकीचं आहे, असं त्यांनी या तक्रारीत म्हटलं होतं.