शौचालय अपूर्णतेप्रकरणी ९३ ग्रामसेवकांना नोटीस

toilet

जळगाव- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामाची कामे असमाधानकारक झाल्याने २० पेक्षा कमी शौचालयाचे काम असलेल्या जिल्ह्यातील ९३ ग्रामपंचायतीची सखोल दप्तर तपासणी केली जाणार आहे. यासाठी त्यांना नोटीस देण्यात आली आहे. या प्रकरणी ग्रामसेवकांवर कारवाईचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. तसेच उद्दिष्ट पूर्ती करणाऱ्या १२ गटविकास अधिकाऱ्यांना शिस्तभंग कारवाईची नोटीस बजाविण्यात येणार आहे.

 जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या शौचालय बांधकाम प्रगतीचा २६ डिसेंबर अखेर अहवाल घेतला असता सन २०१७-२०१८ मध्ये २० पेक्षा कमी शौचालयेदेखील पूर्ण झाले नसल्याचे आढळून आले आहे. यामुळे हे कामकाज अतिशय असमाधानकारक असल्याचे दिसून येते. परिणामी या योजनेचा मुळ उद्देश सफल झालेला नाही. या ग्रामसेवकांवर कारवाईचे आदेश देऊनही गटविकास अधिकाऱ्यांनी ते केल्याने १२ गटविकास अधिकाऱ्यांना शिस्तभंगाबाबतची नोटीस दिली जाणार आहे. यासह अपूर्ण कामे असलेल्या ९३ ग्रामपंचायतीचे सखोल दप्तर तपासणी केली जाणार आहे. यासंबधी ग्रामसेवकांची बुधवारी आज बोलवण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...