नवी दिल्ली: आजपासून नवंवर्षाची सुरुवात होत आहे. आजपासूनच लहान मुलांच्या म्हणजेच १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण रजिस्ट्रेशनसाठी सुरुवात झाली आहे. मात्र ओमायक्रॉनचे (Omicron) संकट अजूनही जगभर वावरत आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने (Union Ministry of Health and Family Welfare)राज्यांना पत्र पाठवले आहे. केंद्राने या पत्राद्वारे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना दिल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण (Secretary Rajesh Bhushan) यांच्याकडून पाठवल्या गेलेल्या पत्रात काही सुचना दिल्या आहेत. अनेक राज्यांत ओमायक्रॉन संसर्गासह कोरोनाच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे राज्यांनी कोरोना चाचणी करण्यासाठी २४ तास बूथ उभारणे, या बुथवर रॅपीड अँटीजन टेस्टची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुचना केल्या आहेत. तसेच रुग्णांना स्वदेशी बनावटीच्या कीट वापरण्याचा सल्ला दिला आहे.
देशात ओमायक्रॉनचा संसर्ग पसरू नये यासाठी सर्व राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी तातडीने ही पाऊले उचलावीत अशा सूचना केंद्राने राज्यांना दिल्या आहेत. तसेच मृत्यूचा आकडा वाढू नये यासाठी काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- वैष्णोदेवी यात्रेत चेंगराचेंगरी कशी झाली? धक्कादायक कारण आले समोर
- ‘अनेक संकटं येऊन गेली पण समाधान याचे की…’,फडणवीसांकडून नवंवर्षाच्या शुभेच्छा
- …म्हणून बैलगाडा शर्यत हणून पाडली; आढळराव पाटलांचा प्रशासनावर आरोप
- ५ दिवसांत १० मंत्री, २० आमदार कोरोनाबाधित!- अजित पवार
- ठाकरे सरकारने ‘भ्रष्टाचार युक्त महाराष्ट्र’ केले आपण ‘भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र’ करूया- किरीट सोमय्या
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<