शाहरुख खानला नोटीस

खोटी जाहिरात केल्याप्रकरणी शाहरुख अडचणीत

वेबटीम : चित्रपटातील कलाकार ,प्रसिद्ध खेळाडू आदी मंडळींना जाहिरातीमध्ये पाहून अनेक जण त्यांचे अनुकरण करत असतात. जाहिरातीमध्ये त्यांनी वापरलेल्या सौंदर्य प्रसाधानांचा वापर केल्याने अनेकवेळा नुकसानही होते. असाच एक प्रकार मध्यप्रदेशमध्ये घडला असून राजधानी भोपाळमधील एका न्यायालयाने दाढी करण्याच्या क्रीमचा भ्रामक प्रचार केल्याच्या प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना बॉलिवूड स्टार शाहरुख खानला नोटीस पाठवली आहे. या नोटीसला २६ ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

नक्की काय म्हटलं आहे याचिकेत
याचिकेत शाहरुख खानवर दाढी करण्याच्या क्रीमचा भ्रामक प्रचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. राजकुमार पांडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याने सांगितले की, शाहरुख खान करत असलेल्या जाहिरातीतील दाढी करण्याच्या क्रीमचा आपण वापर केला, यामुळे चेहऱ्यावरील त्वचा निघाली. मात्र जाहिरातीमध्ये शाहरुख, ‘ही सर्वात चांगली क्रीम असल्याचे म्हणत आहे’. या क्रीममुळे जखमी झालेल्या राजकुमारला रुग्णालयात उपचार घ्यावे लागले.पांडे यानी दिलेल्या माहितीनुसार, या क्रीमची तपासणी करण्यात आली तेव्हा ही सर्वात खराब क्रीम असल्याचे दिसून आले. शाहरूखसह क्रीम बनवणाऱ्या कंपनीलाही नोटीस पाठवण्यात आली आहे

You might also like
Comments
Loading...