वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वारीस पठाणांना कलबुर्गी पोलिसांकडून नोटीस

मुंबई : १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा“ असं धार्मिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य एआयएमआयएमचे प्रवक्ते वारीस पठाण यांनी केलं होतं. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कलबुर्गी पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

कलबुर्गीचे पोलीस आयुक्त एम.एन.नागराज यांनी याबाबत माहिती दिली आहे. ”आम्ही वारीस पठाण यांना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल नोटीस बजावली आहे. २९ फेब्रुवारी रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून, त्यांना आपले म्हणने मांडण्यास सांगण्यात आले आहे.

Loading...

दरम्यान, एआयएमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देखील वारीस पठाण यांच्यावर कारवाई केलेली आहे. वारीस पठाण यांना माध्यमांवर बोलण्यास पक्षाकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता पक्ष परवानगी देत नाही तोपर्यंत वारीस पठाण हे कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करू शकणार नाहीत.

तर, वारीस पठाण यांनी याबाबत खुलासा केला आहे. ‘ माझं ते वक्तव्य हिंदूविरोधी नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो आणि मला आणि माझ्या पक्षाला बदनाम केलं जातं आहे, असं वारीस पठाण यांनी याप्रकरणी माध्यमांसमोर आपली बाजू मांडतांना सांगितलेलं आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका